ST Worker Protest : देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतल्याशीवाय राष्ट्रवादीचं राजकारण पूर्ण होत नाही का? - चित्रा वाघ
उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर चपला फेकल्या. ST संप चिघळवण्यापाठीमागे देवेंद्र फडणवीस व भाजप असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून देवेंद्र फडणवीस व भाजपचे नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचं राजकारण पूर्ण होत नाही का? असा प्रश चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.;
उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर चपला फेकल्या. या सगळ्यावर आता भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी कोणत्याही नेत्याच्या घरी असा मोर्चानेने चुकीचे आल्याची प्रतिकिया दिली आहे.
चित्रा वाघ काय म्हणाल्या आहेत...
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात सरकार आल्यानंतर एसटी महामंडळाचे विलीनीकरण करून हा मुद्दा स्पष्ट दिला होता. आंदोलकांकडून आज वारंवार हेच बोलले जात आहे. पण आता हे आंदोलन शरद पवार यांच्या घरी केले त्यावेळी आता राष्ट्रवादीवाले हे सर्व भारतीय जनता पक्षाने केलं किंवा देवेंद्र फडणीस यांनी केलं असे म्हणत आहेत. देवेंद्र फडणवीस व भाजपचे नाव घेतल्याशिवाय राष्ट्रवादीचं राजकारण पूर्ण होत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
नुकतेच एसटी (st workers) कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपतय की काय असे वाटत असतानाच एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. आज एस टी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक (silver oak) या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असून मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले. याठिकाणी चप्पल आणि दगडफेक सुरू झाली. कर्मचाऱी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.