Sonu Nigam : सोनू निगमला धक्काबुक्की करणारा आमदार पुत्र कोण? | Video

सोनू निगम व त्याची संपूर्ण टीम निघाली होती ते जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलाकडूनच घडला आहे. नक्की काय घडलं? आमदार पुत्रावर गुन्हा दाखल झाला आहे की नाही?

Update: 2023-02-22 04:21 GMT

प्रसिद्ध गायक सोनू निगम यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला. बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्फेकर यांनी आयोजित केलेल्या चेंबूर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी हा संपूर्ण प्रकार घडला. कार्यक्रम संपल्यानंतर गायक सोनू निगम व त्याची संपूर्ण टीम निघाली होती ते जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार आयोजक असलेल्या आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्या मुलाकडूनच घडला आहे. आमदार पुत्रानेच धक्काबुक्की केल्यामुळे त्याच्या विरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या दिवशी नक्की काय घडलं?

मुंबईतील चेंबूर भागात असलेल्या डायमंड उद्यान परिसरात चेंबूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या गायनाच्या कार्यक्रमाची आयोजन केले होते. रात्री दहाच्या सुमारास कार्यक्रम संपवून सोनू निगम व्यासपीठावरून खाली उतरत असताना त्याच वेळी प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्फेकर याने पाठीमागून सोनू निगम यांना पकडले. यावेळी सोनू निगम यांच्या सहकाऱ्यांनी त्याला अडवले. अडवल्या नंतर त्याने दोघांनाही धक्काबुक्की करत पायऱ्यांवरून खाली ढकलले मग या सगळ्या धक्काबुकीत सोनू निगम ही खाली पडला. निगम यांच्या एका सहकार्याच्या डोक्याला देखील दुखापत झाली आहे. या सगळ्या प्रकारानंतर आता चेंबूर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आमदार पुत्र स्वप्निल फातर्फेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.




Tags:    

Similar News