सोनिया गांधी सक्रिय राजकारणातून निवृत्त?

Update: 2023-02-26 06:51 GMT

काँग्रेसचे 85 वे राष्ट्रीय अधिवेशन सध्या रायपूर या ठिकाणी सुरू आहे. या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे संकेत दिले आहेत. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, 1998 साली मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. 25 वर्षात काँग्रेसने अनेकदा मोठे यश संपादन केले आहे आणि निराशाही पहिली आहे. काँग्रेस आणि जनता यांच्यातील संवादाचा वारसा समृद्ध झाला असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या. यापुढे बोलताना त्यांनी राहुल गांधींचे कौतुक करत स्वतः राजकारणातून निवृत्त होत असल्याचे संकेत दिले आहेत..

राहुल गांधी यांचे मानले आभार..

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा पूर्ण केली. कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही पदयात्रा कश्मीर पर्यंत जाऊन पोहोचली. याच भारत जोडो यात्रे विषयी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली 2004 आणि 2009 साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या भारत जोडो यात्रेने झाला त्याचे मला जास्त समाधान आहे. त्यामुळे मी वैयक्तिकरित्या समाधानी आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोनिया गांधी या सक्रिय राजकारणातून आता निवृत्त होणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Tags:    

Similar News