स्वीडनच्या संसदेने बुधवारी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून मॅग्डालेना अँडरसन यांना मान्यता दिली. अँडरसन सध्या देशाचे अर्थमंत्री आहेत. शुक्रवारी त्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला अँडरसन यांची सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेते पदी निवड झाली होती. त्यानंतर अँडरसन बुधवारी संसदेत बहुमताच्या आकड्यापासून दूर होत्या. स्वीडनला पंतप्रधान होण्यासाठी संसदेत बहुमताची आवश्यकता नाही, संसदेच्या 349 सदस्यांपैकी 174 सदस्यांनी अँडरसनच्या विरोधात मतदान केले. मात्र, 117 खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. 57 खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही. यामध्ये एक खासदार गैरहजर होता.
अँडरसन यांच्या राजकीय कारकिर्दीला 1996 मध्ये सुरुवात झाली. त्या पंतप्रधान गोरान यांच्या राजकीय सल्लागार देखील होत्या. त्यांनी उप्पसाला विद्यापीठात शिक्षण घेतले असून त्या ज्युनियर स्विमिंग चॅम्पियन देखील आहेत. त्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सरकार जो अर्थसंकल्प सादर करणार आहे त्याला विरोधी पक्षाकडून जोरदार विरोध होऊ शकतो करण अर्थसंकल्पास विरोध करणार असल्याचे विरोधी पक्षाने म्हंटले आहे. अँडरसन यांना यापूर्वीच सेंट्रल पार्टी आणि सोशल डेमोक्रॅट्स पक्षाचा पाठिंबा मिळाला होता. मात्र, केंद्रीय पक्ष त्यांच्या उमेदवारीच्या विरोधात जाण्याची भीती होती. सेंट्रल पार्टीने म्हटले आहे की ते अँडरसन यांना पंतप्रधान म्हणून पाठिंबा देतील पण सरकारच्या बजेटला विरोध करेल.