मराठा आरक्षण आंदोलनात महिला नेत्यांनी मध्यस्ती करावी ? | Pooja More on Maratha Aarkshan
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण साठी सुरु केलेले आंदोलन आता शेवटच्या टप्प्यात आहे. सरकारवर प्रचंड दबाव वाढलाय. मराठा समाजाच्या एकत्रित संघटनशक्तीचा तडाखा सरकार तसंच अनेक लोकप्रतिनिधींना बसलाय. जगभरात चर्चिलं गेलेलं हे मराठा आरक्षण आंदोलन जेव्हा सुरू झालं तेव्हा याचं नेतृत्व महिलांच्या हाती होतं, हळूहळू या आंदोलनातून महिला कमी होतायत का, महिलांचं नेतृत्व मागे पडल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं का, मराठा आरक्षणाच्या या लढ्यात महिलांचं स्थान काय, आंदोललनातून महिला नेतृत्व पुढे येईल का या आणि अशाच असंख्य प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न केलाय मॅक्सवुमन संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी. ही चर्चा नक्की पाहा आणि शेअर ही करा.