जळगावमध्ये शिवसेनेची 'जयश्री', भाजपचा गेम

सांगली नंतर जळगावात भाजपचा टप्प्यात कार्यक्रम?;

Update: 2021-03-18 11:15 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड गाजत असलेल्या जळगाव महापालिकेच्या महापौरपदी जयश्री महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची आज निवड करण्यात आली. शिवसेनेने ही निवडणूक ४५ विरूध्द ३० अशा फरकाने जिंकली. शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांना 45 तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 30 मत मिळाली. त्यामुळे जळगाव महापालिकेवर भगवा फडकला आहे.

भाजपचे 27 नगरसेवक फुटले तर एम आय एम च्या तीन आणि शिवसेनेचे 15 अश्या एकूण 45 नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेने भाजपच्या हातून सत्ता काबीज केली.

सकाळी 11 वाजता ऑनलाईन निवडणूक घेण्यात आली. भाजप आणि शिवसेनेचे महापौर, उपमहापौर पदाचे उपस्थित होते. भाजपच्या फुटीर नगरसेवकांनी ठाण्याहून आपला ऑनलाइनला मतदानाचा बजावला तर भाजपच्या उर्वरित नगरसेवकांनी सहलीला गेलेल्या ठिकाणाहून मतदान केलं.

गेल्या अडीच वर्षापूर्वी जळगाव आणि सांगली महापालिकेवर स्पष्ट बहुमत भाजपनं मिळवलं होत. मात्र भाजपचं सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीने सुरवातीला सांगली महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता मिळवली त्यानंतर महिना उलटत नाही तोच शिवसेनेनीही अवघ्या 15 नगरसेवकांच संख्याबळ असतांना भाजपच्या नाराज 27 नगरसेवकांना आपल्या गळाला लावलं.

थेट मातोश्री वरून हालचाली झाल्यानंतर निवडणुकीच्या तीन दिवसअगोदार नाराज नगरसेवकांना ठाण्यात सहलीला पाठवले यात मंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा रोल होता.

Tags:    

Similar News