ईडीच्या छाप्यानंतर भावना गवळी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...
आणीबाणी सारखी वागणूक याठिकाणी मिळत असून सर्वच शिवसेनेच्या मंत्री नेत्यांना टार्गेट केले जातय...;
मला ईडी कडून कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नव्हती. ईडी चे अधिकारी संस्थांवर आले असून ते त्या ठिकाणी चौकशी करत आहेत. आणीबाणी सारखी वागणूक याठिकाणी मिळत असून सर्वच शिवसेनेच्या मंत्री नेत्यांना टार्गेट केले जात असल्याची प्रतिक्रिया खासदार भावना गवळी यांनी दिली आहे. आज सकाळ पासुन भावना गवळी यांच्या पाच शिक्षण संस्थांवर ईडी कडून कारवाई केली जात आहे. अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर ईडीचे पथक दाखल झालं असल्याच देखील म्हटलं जातय. ईडी कडून चौकशी चालू असुन या सगळ्या प्रकारावर खासदार भावना गवळी यांनी आता पहीली प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्या संस्थेचा एफआयआर मी स्वतः नोंदवला होता. तो हिशोब मला मिळत नव्हता म्हणून मी स्वतः तक्रार देखील दाखल केली होती. त्यातले एकच वाक्य आणि एकच आकडा घेऊन ट्विट करत मोठा राईचा पर्वत बनवायचा असा काही दिवसांपासून राजकीय नेत्यांनी खेळ मांडला आहे. माझ्या संस्थेत ग्रामीण भागातील अनेक मुले शिक्षण घेतात. विद्या देण्याचे काम त्या ठिकाणी होत असून मी पाच वेळा या ठिकाणी खासदार आहे. कदाचित हेच काही लोकांना चांगले दिसत नसावे. अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे