नाशिक: स्वयंरोजगार निर्मितीसाठी शिवसेनेकडून ७० महिलांना शिलाई मशीन वाटप
कोरोना काळात अनेक महिलांचा हातचा रोजगार गेला आहे. विशेष म्हणजे निराधार महिलांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे.घरीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आणि त्यात नोकरी सुद्धा मिळत नसल्याने कुटुंब चालवणे अवघड झाले आहे. अशातच नशिक शहरात शिवसेना अशा महिलांच्या मदतीला धावून आली आहे.
नाशिक शहरातील सिडको भागातील सह्याद्रीनगर येथे शिवसेनेच्या वतीने महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ७० निराधार महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. प्रत्येक महिलेला घरगुती काम देण्यात आले. यात कंपन्यांचे शीट कव्हर्स, मेडिकल कॅप, पेपर पॅकिंग, रॉ मटेरियल अशा पद्धतीने कामे देण्यात आली. तर महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासन यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिले.