शिंदेसाहेब शिवसेना हरता काम नये, शिवसेना नेत्याचे ट्विट..

Update: 2022-06-29 05:21 GMT

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात आता भाजपने उडी घेतलेली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या काही जेष्ठ नेत्यांनी रात्री उशिरा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. आणि राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी राज्याच्या विधानसभेचे विशेष अधिवेशन 30 जून रोजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता राज्यात नक्की काय राजकीय घडामोडी घडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . या सगळ्या घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ट्विट करत, आदरणीय शिंदे साहेब शिवसेना हरता कामा नये शिवसैनिकांची मेहनत वाया जाऊ नये जय महाराष्ट्र असं म्हणत टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलेले आहे. भाजपतर्फे गेल्या आठ दिवसात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती, पण काल पासून देवेंद्र फडणवीस हे ऍक्टिव्ह झालेले आहेत. मंगळवारी फडणवीस यांनी दिल्लीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर काही नेत्यांची भेट घेतली आणि त्यानंतर मुंबईत परतल्यावर त्यांनी भाजपच्या काही नेत्यांसह राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यात सध्या जो काही पेचप्रसंग निर्माण झालेला आहे तो पाहता सरकारने बहुमत सिद्ध करावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली व त्यानंतर आज सकाळी राज्यपालांनी उद्या सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे. या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असताना दिपाली सय्यद यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय बनत आहे त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, "माननीय शिवसेना आमदारमहोदय,हिंदुत्वाच्या मुद्यावरून युती झाली तर पुढची साडेसात वर्ष सत्तेची मग शिवसेनेला मुख्यमंत्री पद त्यातअसणार का? बहुमतचाचणी करण्याआगोदर पक्षप्रमुखांशी बोलणार का? आदरणीय शिंदेसाहेब शिवसेना हरता कामा नये.शिवसैनिकांची मेहनत वायाजाऊ नये.जय महाराष्ट्र"

Tags:    

Similar News