आता पाकिस्तानात एकनाथ शिंदेंची चर्चा..

Update: 2022-06-24 06:23 GMT

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली आहे. 40 पेक्षा अधिक आमदारांचा एकनाथ शिंदे यांना पाठींबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता संपूर्ण देशात लक्ष महाराष्ट्रातील घडामोडींवर लागून आहे. संपूर्ण देशात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडाची चर्चा आहे. इतकंच काय पाकिस्तान मध्ये सुद्धा शिंदे यांची चर्चा आहे. ते पाकिस्तानात साध्य ट्रेंड वर आहेत. मागच्या तीन दिवसांपासून पाकिस्तानमध्ये गूगल वरती जी माहिती सर्च केली जात आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव टॉप वरती आहे. पाकिस्तानमध्ये असलेल्या अनेक लोकांनी एकनाथ शिंदे यांची माहिती गुगलवर सर्च केल्याचं समोर आला आहे.



 त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे हे बंड महाराष्ट्रातच नव्हे देशातच नव्हे तर संपूर्ण जगभर चर्चेत आले आहे. फक्त पाकिस्तानचा नाही तर मलेशिया, सौदी अरेबिया, थायलंड, जपान, नेपाळ, बांगलादेश व कॅनडा मध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या बंडाची चर्चा आहे. महाराष्ट्राचं राजकारण हादरवून सोडणारे एकनाथ शिंदे नक्की कोण आहेत? याची उत्सुकता सार्‍या जगाला लागली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा गूगल वरती एकनाथ शिंदे कोण आहेत? हे सर्च केलं जात आहे.


Tags:    

Similar News