गुलाबराव पाया पडण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला आहे का? । Shilpa Bodkhe
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांसोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला हा पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही क्षणातच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही मोठ्या नेत्यांनी सुद्धा मंत्रीपदाच्या शपथ घेतल्या. या सगळ्या प्रकारानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्कप्रमुख प्रा. शिल्पा बोडके यांनी केलेले एक ट्विट सध्या जोरदार चर्चेत आहे. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या विषयीचे हे ट्विट आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी गुलाबराव पाटील यांना आता पाया पडण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहिला आहे का? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे. नक्की त्यांनी असं ट्विट का केला आहे पाहूयात...
तर शिल्पा बोडके यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ राजभवन इथला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातील काही सहकाऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर इतर सहकाऱ्यांनी मंत्रीपदाच्या शपथ घेतल्या. हा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर अजित पवार यांना भेटण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. यामध्ये शिवसेनेचे सुद्धा नेते होते. खरंतर आज पर्यंत शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि खास करून अजित पवार यांच्यावर बोट दाखवत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिल्पा बोडके यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात गुलाबराव पाटील दिसत आहेत व बहुदा दे अजित पवार यांच्या पाय पडत आहेत. हाच व्हिडिओ शेअर करत ''आता गुलाबराव पाया पडण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला आहे का..???'' असा सवाल केला आहे..
आता गुलाबराव पाया पडण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला आहे का..??? pic.twitter.com/akfWbjdZOb
— Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) July 2, 2023