राज्याचे राजकारण सध्या एका व्हिडिओमुळे चांगलेच तापले आहे. शिवसेना नेत्या शितल म्हात्रे आणि भाजप आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. या व्हिडिओ वरून राज्याच्या राजकारणात गदारोळ तर झाला आहेच त्याचबरोबर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत. नितेश राणे यांनी तर या व्हिडिओचा मास्टर माईंड कलानगर मध्ये असल्याचा थेट आरोप केला.
भाजपचे आमदार नितेश राणे काल शितल म्हात्रे यांच्या व्हिडिओ बाबत बोलताना म्हणाले की, मॉर्फ केलेला व्हिडिओ बद्दल काही नावे समोर आले आहेत. मातोश्री नावाच्या पेजवरून व्हिडिओ पोस्ट झाला आहे. युवासेनेच्या दोन कार्यकर्त्यांनी हे केला आहे, पण त्यांच्या मागे जो मास्टरमाइंड आहे तो कलानगर मध्ये आहे. खरंच मर्दानगी असेल तर समोर येऊन बोला. तुम्ही जर हा खेळ सुरू केला तर आम्ही पण करू, पार्टीचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत. कलानगर मध्ये बसून सध्या बदनामी सुरू असल्याची टीका त्यांनी केले. इतकच नाही तर शीतल मात्रे यांची जी बदनामी झाली त्याचा हिशोब द्यावा लागेल असा इशारा सुद्धा नितेश राणे यांनी दिला.
प्रकरणाला नवे वळण?
शितल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आतापर्यंत काही जणांना अटक करण्यात आली आहे. एसआयटी मार्फत या प्रकरणाची चौकाशी सुरु आहे. या प्रकरणात काही तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्यावरूनच काल विधानसभेत गदारोळ सुद्धा झाला. त्यानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या प्रकरणात प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांना अटक का केली नाही? असा प्रश्न केला आहे. राज सुर्वे यांच्या अकाउंट वरून सुद्धा हा कार्यक्रम लाईव्ह होता असं त्यांनी म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना प्रियांका चतुर्वेदी यांनी, तो व्हिडिओ प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या अकाउंट वर लाईव्ह होता. त्यांची बदनामी ही प्रकाश सुर्वेंच्या घरातूनच सुरू झाली. त्यामुळे अटक करायची होती तर त्यांना करायची होती, मुंबई पोलिसांनी दबावाखाली काम करू नये. अन्यथा पोलिसांचा जो सन्मान आहे तो मातीत मिळेल. सायबरचे काम आहे तपासण्याचे ते करतील. असं म्हंटल आहे. तर या प्रकरणामुळे अशा प्रकारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.