अक्कल काढत कपिल शर्मा शोमध्ये जाण्याचा इम्रान खानला घटस्फोटीत पत्नीचा सल्ला

रेहम खानने इम्रान आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा फोटो शेअर करत इम्रानसोबत 'नाव, पैसा, प्रसिद्धी सर्वकाही आहे, पण शहाणपण नाही' त्याने कपिल शर्मा शो मध्ये जावे असा सल्ला दिला आहे.;

Update: 2022-04-01 14:38 GMT

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कठीण परिस्थितीत इम्रानला त्याच्या जवळच्या मित्रपक्षांनी सोडले असून इतकं कमी म्हणून की काय त्यानंतर त्यांच्याच खासदारांनी त्यांना बाजूला केले. शिवाय त्यांचे खास सल्लागारही त्यांना सोडून गेले. इम्रान यांना पंतप्रधान बनवणाऱ्या पाकिस्तानातील बलाढ्य लष्करही आता त्यांना साथ देत नाही. राजकारण आणि मुत्सद्देगिरीच्या सर्वच आघाड्यांवर मागे पडल्यानंतर आता त्यांच्या घटस्फोटित पत्नी रेहम खान हिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी इम्रान खानला चोर, कमी हुशार आणि चारित्र्यहीन असल्याचे सांगितले.

रेहम इम्रान खानला टोमणे मारण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत..

रेहम दररोज ट्विट करून इम्रान खानची खिल्ली उडवत आहे. ती कधी त्याला कॉमेडियन होण्यास सांगते तर कधी कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्याचा सल्ला देते. एका ट्विटमध्ये रेहम खानने इम्रान आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ती असं म्हणतीये की इम्रानसोबत 'नाव, पैसा, प्रसिद्धी सर्वकाही आहे, पण शहाणपण नाही'

अशाच एका ट्विटमध्ये रेहमने खिल्ली उडवत म्हटले आहे की, इम्रानकडे नाव, पैसा, प्रसिद्धी सर्वकाही आहे, पण त्याच्याकडे शहाणपण नाही.

यापूर्वीही त्यांनी इम्रान खान यांना राजीनामा देण्याचा सल्ला दिला होता. मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार असल्याचे इम्रान खानने सांगितले. त्यानंतर रेहमने इम्रान खानला कमी बुद्धिमान असल्याचं म्हंटलं होतं.

पुस्तक लिहून इम्रानच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता

रेहमने पुस्तक लिहून इम्रानच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, इम्रानच्या पक्ष पीटीआयमध्ये पुढे जाण्यासाठी महिलेला त्याच्यासोबत वेळ घालवावा लागतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेहम म्हणाली, 'इम्रानला सन्मानाने राजीनामा देण्याची संधी होती. पण त्याने तसे केले नाही. कारण ते तत्त्वांवर ठाम नसतात. तत्त्वांनुसार न राहिल्यामुळे आमचे लग्न देखीव टिकले नाही.

इम्रान खानचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले

इम्रान खान सुरुवातीपासूनच त्याच्या लग्न आणि प्रेम प्रकरणांमुळे वादात सापडला आहे. क्रिकेट खेळतानाही त्याचे नाव अनेक मुलींशी जोडले गेले. राजकारणात आल्यानंतरही अशा प्रकरणांनी त्यांची पाठ सोडली नाही. प्रदीर्घ प्रेमप्रकरणानंतर त्याने 2015 मध्ये रेहम खानशी लग्न केले. पण त्यांचे प्रेम नऊ महिन्यांतच नाहीसे झाले. लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याआधीच या जोडप्याचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतरही त्यांचे नाते तणावपूर्ण राहिले. एका मुलाखतीत रेहमने इम्रान खानचे वर्णन एहसान फरमोश असे केले आहे.

Tags:    

Similar News