अडीच वर्ष महाविकास आघाडीने उत्तम काम केलं आहे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या राष्ट्रीय संकटावर मात करण्याचं काम केलं. हे सर्व पाहिल्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग फसला असं म्हणणं राजकीय अज्ञान आहे. बंडखोर आमदारांना इथे यावंच लागेल राज्यपालांपुढे यावं लागेल. किंवा विधानसभेत तरी यावं लागेल. विधानसभेच्या प्रांगणात आल्यावर आसाम
किंवा गुजरातचे नेते त्यांना मार्गदर्शन करतील असं वाटत नाही. बंडखोर आमदारांना किंमत मोजावी लागेल असं राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद वापर यांनी म्हंटले आहे ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी, ज्या पद्धतीने शिवसेना आमदारांना गुवाहाटीत नेलं गेलं त्याची वस्तुस्थिती ते आल्यावर सांगतील. इथ आल्यावर आपण सेनेसोबत असल्याचं सांगतील. सरकार मायनॉरिटीत आहे की नाही हे विधानसभा ठरवेल. विधासनभेत जेव्हा बहुमत सिद्ध करावे लागेल तेव्हा सर्व कळेल. असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले...