"मला सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला.." - ठाकरे यांचा टोला

Update: 2022-06-21 08:51 GMT

शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकानाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्ताने खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 22 आमदार नॉटरिचेबल असल्याचे वृत्त येत आहे त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे या सगळ्यावर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत, एकनाथ महाराज की जय हो असं म्हणत एक ट्विट करता उद्धव ठाकरे व दीपाली सय्यद यांना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचे म्हंटले जात आहे त्या ठिकाणी गुजरात पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे नॉटरीचेबल असलेल्या बतमीनंतर शालिनी ठाकरे यांनी ट्विट करता म्हंटल आहे की, "एकनाथ" महाराज की जय....!!! मला सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे,या स्वतःच्या वाक्याचा विसर पडलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज "एकनाथ" महाराज नक्कीच आठवले असतील.

दीपाली ताई आपण आता स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या

काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉटरीचेबल असल्याच्या बातम्या येत आहेत. ते व त्यांच्या संपर्कातील काही आमदार अहमदाबादच्या दिशेने रवाना झाल्याची वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे 22 आमदार हॉटेलमध्ये आहेत, असेही समजते आहे.

Tags:    

Similar News