''मंत्री गुलाबराव पाटील गायब झाले...'' खा. रक्षा खडसेंचा शिवसेनेवर बाण
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजप बरोबर खांद्याला खांदा लावणारा शिवसेना आता बोलायला तयार नाही अशा शब्दात खासदार रक्षा खडसेंनी शिवसेनेवर टीका केली आहे.;
2014 पूर्वी लोडशेडिंग, तसच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप शिवसेना एकत्र आंदोलन करीत होती, एकाच व्यासपीठावर काँग्रेसच्या आघाडी सरकार विरुद्ध लढत होती मात्र आता शेतकऱ्यांचे , सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न असतांना त्याच आघाडी सरकार बरोबर सत्तेत आल्यावर शिवसेना काहीच बोलत नाही, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील गायब झाले आहेत अशी टीका भाजपच्या खासदार रक्षा खडसें यांनी केलाय.
लोडशेडिंग विरुद्ध भाजपने जळगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला यावेळी भाजपचे खासदार उन्मेष पाटील , रक्षा खडसें आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण सह हजारो कार्यकर्ते उपस्थित आहेत . अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्याशिवाय मोर्चा चालूच राहील तसेच रात्रभर झोपण्याची तयारी आमची असल्याच गिरीश महाजन यांनी पवित्रा घेतला आहे