''तर या महान कलावंताची..'' अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

‘’ हे गुपित अमृता फडणवीसांनी फोडलं नसत तर महाराष्ट्राला महान कलाकाराची ओळख झालीच नसती'' संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला;

Update: 2022-07-10 08:39 GMT

एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस मागच्या दीड वर्षात अनेक वेळा रात्री भेटायचे याविषयी तुम्हाला माहित होतं का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीवर विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस रात्री हुडी, गॉगल मलाही ओळखणार नाही असे वेशांतर करून बाहेर पडायचे. असं त्या म्हणाल्या होत्या. ते कसे भेटायचे हे अमृता फडणवीसांनी सांगितल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावत ''हे गुपित अमृता फडणवीसांनी फोडलं नसत तर महाराष्ट्राला महान कलाकाराची ओळख झालीच नसती'' असा टोला लगावला आहे.

''शिंदे यांनी जे केले त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही असं सांगणारे भाजपवाले आता उघडे पडले आहेत. शिंदे यांनी पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले तर घरातील सारे गुपित अमृता फडणवीस यांनी फोडले. हे गुपित जर फोडले नसते तर महाराष्ट्राला महान कलाकाराची ओळख झालीच नसती'' असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. अमृता फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, देवेंद्र फडणवीस कुठल्याही पदावर असले तरीही ते फक्त जनतेची सेवा करत राहतात. महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय परिस्थिती पाहता ते पुन्हा येतील असं मला वाटत होतं. देवेंद्र फडणवीस यावेळी मुख्यमंत्री बनणार नाहीत व कुठलंही पद स्वीकारणार नाहीत हे मला थोडं आधीपासूनच माहीत होतं. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्व कसे आहे हे आता सर्वांनाच समजलं आहे. ते मलाही कधी पण सोडू शकतात व राजकारण सोडून समाजकारण सुद्धा करू शकतात. आणि याची जाणीव आज लोकांना सुद्धा झाली आहे. त्यामुळेच त्यांना लोकांनी इतकं प्रेम दिला आहे. असं अमृता फडणवीस यांनी काल एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस मागच्या दीड वर्षात अनेक वेळा रात्री भेटायचे याविषयी तुम्हाला माहित होतं का? असा प्रश्न विचारल्या नंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस रात्री हुडी, गॉगल मलाही ओळखणार नाही असे वेशांतर करून बाहेर पडायचे असं देखिल त्या म्हणाल्या होत्या.

Tags:    

Similar News