रुपाली चाकणकरांच्या नियुक्तीवर संगीता तिवारींचा विरोध, राज्यपालांना निवेदन
"सध्याच्या काळात महाराष्ट्रात राजकारण अतिशय गढूळ आणि दूषित झाले आहे. फडणवीस आणि शिंदे गटाने कायदा संविधान यांची तोडमोड चालू केली आहे. परंतु कोणीही त्याबाबत ब्र काढत नाही. कदाचित या सरकारच्या दहशती खाली असतील. परंतु सामान्य जनता आता गप्प बसणार नाही. आज या सरकारचा जो मनमानी कारभार चालला आहे. तो अत्यंत चुकीचा आणि लोकशाही चा पायमल्ली करणारा आहे. घाणेरडे हिन दर्जाचे राजकारण फडवणीस आणि शिंदे सरकार करीत आहेत",असे मत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संगीत तिवारी यांनी केले असून त्यावर त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या पदाबद्दल भाष्य केले आहे.
राज्यातील राज्यपाल नियुक्त महिला आयोग अध्यक्ष पद हे संविधानिक पद आहे. या पदावर असणारी व्यक्ती ही निःपक्षपाती असणे गरजेचे आहे असे असताना माननीय महिला आयोग अध्यक्ष संविधानिक पदावर असताना एखाद्या राजकीय पक्षाची महिला अध्यक्ष हे पद कसे घेवू शकते? असा प्रश्न संगीत तिवारी यांनी उपस्थित केला आहे.
हे असंविधानिक आहे. उद्या जर शिंदे फडणवीस राष्ट्रवादी सरकार मधील पदाधिकाऱ्याने कोणा महिलेला त्रास दिला तर या मॅडम तिला निःपक्षपाती पणे न्याय देवू शकतील का ?? म्हणून आम्ही मा राज्यपाल आणि मा न्यायाधीश उच्च न्यायालय यांना एक निवेदन पाठवून कारवाई ची मागणी करीत आहोत. संविधानिक पदाची गरिमा ही टिकलीच पाहिजे असे आमचे म्हणणे आहे. ह्यावर लवकरात लवकर कारवाई चे आदेश निघावे यासाठी आम्ही त्यांना विनंती करत असल्याचे संगीता तिवारी यांनी या निवेदनपत्राद्वारे स्पष्ट केले आहे.