राजकारणात आज महिला येत आहेत. पण त्या महिलांच्या संख्येविषयी रुपाली चाकणकर बोलल्या आहेत. शरद पवार यांच्यासोबत असतानाचे अनुभव त्यांनी अजित पवारच्या भाषणातून सांगितले आहेत. आपल्याला काहीच न काळता कश्या पक्षात हालचाली झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणून राजीनामा मागितला गेल्याचे सुद्धा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीच्या ४० पेक्षा जास्त आमदारांसोबत अजित पवारांनी बंड केले आहे.महाराष्ट्राचे नवे उप मुख्यमंत्री सुद्धा अजित पवार झाले आहेत. या परिस्थितीत शरद पवारांच्या अगदी जवळचे सारे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. यामध्ये ८ जणांना मंत्रिपद सुद्धा मिळाले आहे.पण इतक्या वर्षातील पक्षातील असणारी नाराजी अजित पवारांसोबत रुपाली चाकणकर यांनी सुद्धा बोलून दाखवली आहे.