'मोदी है तो महंगाई है'

Update: 2021-07-02 07:32 GMT

मुंबई: आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्वसामन्यांना आता महागाईचे चटके सहन करावे लागत आहे. त्यातच आता घरगुती गॅस सिलेंडरमागे तब्बल 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली असून, कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 84 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली केली आहे. चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, 'ना खाऊँगा ना खाने दूँगा, गैस सिलेंडर इतना मेहंगा कर दूँगा की पकाने भी नहीं दूँगा, मोदी है तो महंगाई है', असा खोचक टोला चाकणकर यांनी मोदींना लगावला आहे.



1 जुलैपासून नव्या किमती लागू झाल्या असून, जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी गॅस सिलेंडरच्या दरात मोठे बदल करण्यात आले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत 809 रुपयांना मिळणार घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर आता 834.50 रुपयांना घ्यावा लागणार आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटातून जाणारा सर्वसामान्य व्यक्ती हतबल झाला आहे. असं असतानाही पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल आणि गॅसच्या किमती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Tags:    

Similar News