चंद्रकांत दादा आपलं जितकं वय आहे तितकी पवार साहेबांची संसदीय कारकीर्द आहे- चाकणकर

चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांच उत्तर...;

Update: 2021-08-17 10:51 GMT

राज्यातील विधानपरिषद 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधत, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्त्या आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. राज्यपाल यांना वाढत्या वयामुळे लक्षात राहत नाही असा टोलाही लगावला होता. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली होती. या टिकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर देत, 'चंद्रकांत दादा आपलं जितकं वय आहे तितकं पवार साहेबांची संसदीय कारकीर्द आहे' असं म्हंटलं आहे.

सोबतच राज्यपाल हे काही भाजपचे पदाधिकारी नाहीत तेंव्हा चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांच्या मदतीला धावावं. राज्यात भाजपची सत्ता आली नसल्याने ते या ना त्या कारणाने राज्याला अडसर ठरेल अशी कृती करत असल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे.

सोबतच चंद्रकांत पाटील दिल्लीत गेले असता अमित शहा यांनी त्यांना भेट का नाकारली? याबाबत त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे.

Tags:    

Similar News