मुंबई: विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर भाजपने विधिमंडळाच्या परिसरात प्रतिविधानसभा भरवली होती. यावरून राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भाजप निशाणा साधला आहे.
चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, 'काल त्यांनी प्रति विधानसभा मांडली, उद्या प्रति संविधानही मांडतील. सावधान रहें, सतर्क रहें... 'असा टोला चाकणकर यांनी भाजपला लगावला आहे.
तसेच चाकणकर यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा टीका केली, 'आज देवेंद्र फडणीस यांच्या नशिबामध्ये राजयोग होता. मात्र हा राजयोग प्रति विधानसभा निर्माण केली त्या ठिकाणी होता. मात्र दुर्दैवाने ही सुद्धा संधी त्यांना मिळाली नाही,' अशी टीका त्यांनी केली.