रोहिणी खडसेंसह कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

Update: 2024-11-14 07:50 GMT

१३ नोव्हेंबर रोजी बोदवड तालुक्यातील जलचक्र मुलतानी तांडा येथे रोहिणी खडसे या प्रचाराला गेल्या असता प्रचार रॅलीत दोन गटात मारामारीचा प्रकार घडला. सदर प्रकार घडल्यानंतर रॅलीतील तिन्ही युवकांना खूप मारण्यात आले. हल्लेखोरांवर त्वरित कारवाई व्हावी, यासाठी रोहिणी खडसे आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड पोलिस ठाण्यात येऊन धडकल्या. यावेळी तक्रार घेण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ करताना आढळल्यावर रोहिणी खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. तसेच, रात्रीच्या दीड वाजेपर्यंतही कुठलीच कारवाई न झाल्याने गुन्हेगारांना अटक करा आणि गुन्हा दाखल करा ही मागणी करीत बोदवड पोलिस ठाण्यात रोहिणी खडसे यांनी कार्यकर्त्यांसह पंगत मांडली आणि पोलीस ठाण्याच्या आवरतच खिचडी खाऊन प्रशासनाचा निषेध केला आहे.

या प्रकरणावर रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया

रोहिणी खडसे म्हणाल्या की, "माझ्या काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. मी माझ्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याच काम करतेय. कार्यकर्त्यांना मारहाण झाली तेव्हापासून ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आले आहेत. आमची एवढीच अपेक्षा आहे की, ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण आमच्या कार्यकर्त्यांवर मारहाण झाल्याची ही दुसरी घटना आहे. चार दिवसांमध्ये जर आमच्या कार्यकर्त्यांवर दोनदा मारहाण केली जात असेल, तर त्यांना काहीतरी संरक्षण असावं अशी अपेक्षा आहे. आमच्या सुरक्षिततेसाठी न्याय सरकारकडून मिळावा, यासाठी कार्यकर्ते पोलीस स्टेशन मध्ये बसले. माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच काम मी करतेय. त्यांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आणि त्यांना न्याय मिळेल असा मला विश्वास आहे". असं मत रात्री पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या रोहिणी खडसे यांनी व्यक्त केले आहे.

Tags:    

Similar News