रेणू शर्मा ऑन एॅक्टीव्ह मोड, म्हणाल्या "माझ्यावर आरोप थोपण्यात आले"

Update: 2021-03-10 07:45 GMT

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा बलात्कार प्रकरणात नवीन ट्विस्ट आणलं आहे.

रेणू शर्मा यांनी बुधवारी सकाळी 11 वाजून 14 मिनिटांनी एक ट्विट केलं असून ज्यात "ज्यांनी मला हनी ट्रॅप ब्लॅकमिलर म्हंटलं होतं, त्यांच्या घरातील आई, बहिण, बायको, मुली त्यांचं सर्व कुटुंब हेच करत असतील. त्यामुळेच माझ्यावर आरोप थोपण्यात आले."


रेणू शर्मा यांच्या या ट्वीटवर 'पुणेरी' नावाच्या एका अकाऊंटवरून "मग तुम्ही तक्रार मागे का घेतली? लढायला पाहिजे होते तुला सुद्धा न्याय मिळाला असता?" अशी प्रतिक्रीया दिली.

त्याला उत्तर देताना रेणू शर्मा यांनी "अच्छा कौन देगा बतादो?" असे म्हटलं आहे.


रेणू शर्मा यांनी केलेल्या या ट्विटवरून त्या अजूनही आपल्या आरोपावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणात काही घडामोडी घडल्यास धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात.

दरम्यान, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या गायिकेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. तिने केलेल्या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. राज्याच्या मंत्र्यानेच महिलेवर बलात्कार केला म्हणत भाजप नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र काही दिवसांनी रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतली.

Tags:    

Similar News