पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे. नैतिकता समितीची यासंदर्भात गुरवारी बैठक झाली. यामध्ये हा प्रस्ताव ६ - ४ मतांनी मंजुर करण्यात आला आहे. हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.
मोइत्राचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस
नैतिकता समितीच्या बैठकीत महुआ मोइत्रा यांची यांचे व्यवहार व आचरण अनैतिक मानण्यात आले असून लोकसभा सदस्य पद रद्द करण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली आहे. ५०० पानांच्या अहवाल समितीने देत महुआ मोइत्रावर कठोर शिक्षा देण्याची शिफारस केली आहे. हा अहवाल समितीचे अध्यक्ष विनोज सोनकर लोकसभा अध्यक्षांकडे देणार आहेत.
तृणमूल काँग्रेस ची भूमिका
तृणमूल ने आपल्या पक्षातील खासदाराचे समर्थन केले आहे. ते म्हणाले आहेत की केंद्र सरकारकडून त्रास दिला जातोय मोइत्राच्या विरोधातला आरोप सिद्ध होण्याआधीत संसदेची समिती कशी काय कारवाई करू शकेल.
नैतिकता समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर म्हणाले
नैतिकता समितीचे अध्यक्ष विनोद सोनकर म्हणाले खा. मोइत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द होऊ शकते. त्यांना सदस्य म्हणून अपात्र ठरवले जाईल कारण हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबधित आहे.पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा मुद्दा नाही. तर संसदेची लॉग इन, आयडी एखाद्या व्यावसायिकाला देण्यात आले. याचा दुरूपयोगही झाला असता
महुआ मोइत्रा यांची प्रतिक्रिया
भारतीय लोकशाहीचा मृत्यू झाल्याचे हे निर्देशक आहे. विद्यमान लोकसभेतून माझी हकलपट्टी केली तर मी पुढील लोकसभेत मोठ्या मताधिक्याने परतेन, मात्र, यामुळे गप्प बसणार नाही. आधी माझी हकलपट्टी होऊ द्या, मग पुढचं पाऊल उचणार असल्याची प्रतिक्रिया महुआ मोइत्रा यांनी दिली आहे.