भाजत नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. अमरावती भाजपच्या उमेदवार नवणीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊतांनी भाषेची मर्यादा ओलांडली आहे. ही बाई नाची, बबली आणि डान्सर असा उल्लेख करत राऊतांना राणांवर व्यक्तीगत आक्षेपार्ह टीका केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी संजय राऊत अमरावतीत आले, यावेळी सभेच्या व्यासपीठावरून बोलताना संजय राऊतांनी नवनीत राणांवर केवळ टीकाच केली नसून भाषेच्या सभ्यतेची सीमा देखील ओलांडली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
यावेळी संजय राऊत नवनीत राणांवर टीका करत म्हणाले की, बाई खुनावेल, डोळा मारेल तरी जायचं नाही. बळवंत वानखेडे विरोधात नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे, असं राऊत म्हणाले.
तर, ही लढाई मोदी विरूद्ध उद्धव ठाकरे, ही लढाई मोदी विरूद्ध शरद पवार, ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी आहे.’ असे वक्तव्य करत राऊतांनी राणांवर हल्लाबोल केलाय. तर दोन दिवसांपासून संजय राऊत अमरावतीत आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेमुळेच राम मंदिर झाल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
राऊतांच्या विधानावर राणांचा पालटवार
अमरावती भाजपच्या उमेदवार नवणीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊतांनी भाषेची मर्यादा ओलांडली आहे. ही बाई नाची, बबली आणि डान्सर असा उल्लेख करत राऊतांना राणांवर व्यक्तीगत आक्षेपार्ह टीका केली आहे. तर नवणीत राणांनी याला प्रतिउत्तर देत म्हटलं आहे की, संजय राऊंतांनी केलेलं वक्तव्य हे साधारण टिप्पणी नसून हा महिलांचा अवमान आहे याउलट संजय राऊत हेच सध्या काँग्रेसच्या दरबारात नाचत आहेत, असा पलटवार नवनीत राणांनी केला.