मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंची एन्ट्री

Update: 2022-08-23 09:59 GMT



शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी शिवसेनेचे आदित्य ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहेत पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे मध्ये रश्मी ठाकरे एन्ट्री करणार आहेत .

शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि त्यांच्या पत्नी शिवसेना नगरसेवक नंदिनी विचारे यांच्या वतीने मंगळवारी महामंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भरून रश्मी ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ठाणे नगरीत त्यांच्या स्वागताचे बॅनर लावले गेले आहेत .मुलुंड चेक नाक्यापासून रश्मी उद्धव ठाकरे यांचे ठाणे नगरीत स्वागत असा मजकूर लिहिलेले फलक लावण्यात आले आहे

आजच्या कार्यक्रमात रश्मी ठाकरे बंडखोरांविरुद्ध बोलणार का हे पाहण्यासाठी अनेकांची उत्सुकता वाढली आहे .

Tags:    

Similar News