"चंदाजीवी पेक्षा आंदोलनजीवी चांगले"
महुआ मोईत्रा यांचा पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमुल कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहें. तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी भाजप यांच्यामध्ये मोठं वाकयुद्ध सुरु असताना आता ममता बॅनर्जी यांना तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची साथ मिळाली आहे.
अलिकडे महुआ मोईत्रा यांची लोकसभेतील भाषण मोठ्या प्रमाणात जगभरात पाहिली जात आहेत. त्याच महुआ मोईत्रा यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तरप्रदेशमध्ये राम मदिराचं बांधकाम सुरु झालं आहे. या मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात लोकांकडून निधी गोळा केला जात आहे. राम मंदिराच्या वास्तविक खर्चापेक्षा अधिकचा निधी जमा केला गेला असल्याचं काही राजकीय पक्षाचं म्हणणं आहे. विशेष बाब म्हणजे राम मंदिरासाठी हवी असलेली रक्कम गोळा करुन झाली असली तरीही अजुनही निधी गोळा करण्याचं काम सुरु आहे. हाच धागा पकडत थासदार महुआ मोईत्रा यांनी आंदोलक शेतकऱ्यांना संसदेत आंदोलनजीवी म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
या ट्विट मध्ये त्यांनी चंदाजीवी पेक्षा आंदोलनजीवी चांगले आहेत असं म्हटलं आहे.