'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच भारती पवारांना भेटल्या

Update: 2021-07-19 09:57 GMT
त्या व्हायरल व्हिडिओनंतर रक्षा खडसे पहिल्यांदाच भारती पवारांना भेटल्या
  • whatsapp icon

भाजप खासदार भारती पवार यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर 2019 मधील लोकसभेत भारती पवार यांचा शेतकऱ्यांच प्रश्न मांडत असताना, त्यांच्या मागच्या बेंचवर बसलेल्या भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांचा हसण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून या दोन्ही खासदारांवर सोशल मिडियावरून अनेकांनी टीका सुद्धा केली होती. व्हायरल व्हिडिओनंतर आज पहिल्यांदाच रक्षा खडसे यांनी भारती पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी जाऊन भेट घेतली. तसेच नवनियुक्त मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद मिळाल्याबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्या.



    Full View

 मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महिला खासदार भारती पवार यांना संधी मिळाली आहे. पवार यांच्याकडे केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण राज्यमंत्री पदाचा कारभार देण्यात आला आहे. तसेच आज पासून सुरु झालेल्या अधिवेशनात त्या पहिल्यांदाच मंत्री म्हणून उपस्थित रहाणार आहे.
Tags:    

Similar News