एकनाथ खडसे यांच्या ईडी कारवाईवर प्रश्न करताच रक्षा खडसे पडल्या संभ्रमात..
नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी सरकारची भूमिका व धोरणे तसेच योजनांविषयी माहिती देण्यासाठी जळगावात भाजप कार्यालयात खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ खडसे यांच्या कारवाईबाबत प्रश्न विचारल्याने रक्षा खडसे या चांगल्या संभ्रमात पडल्या. एकनाथ खडसे यांच्यावर ईडी च्या कारवाई बाबत न्यायालयाच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली खरी मात्र केंद्राची कारवाई योग्य की अयोग्य याबाबत पत्रकारांनी विचारले असता ईडी कडून विनाकारण कोणालाही टार्गेट केले जात नाही तर तक्रारी व पुराव्यांच्या आधारावरच ईडी कडून चौकशी केली जात असल्याची प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली.
पत्रकारांच्या प्रश्नावर रक्षा खडसे या चांगल्याच धर्मसंकटात सापडल्या कारण एकीकडे सासर्याची बाजू तर दुसरीकडे पक्षाची बाजू त्यामुळे रक्षा खडसे यांना चांगलाच संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पण रक्षा खडसे यांनी दिलेल्या प्रतिक्रिये म्हंटल आहे की, ईडी कडून विनाकारण कोणालाही टार्गेट केले जात नाही. तसेच तक्रारी व पुराव्याच्या आधारावरच ईडी चौकशी करते. असे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. मात्र या मतानुसार एकनाथ खडसे यांच्यावर झालेली कारवाई ही योग्य? असा अर्थ यातून काढला जातोय , मात्र या सर्व प्रकारामुळे एकीकडे सासरे दुसरीकडे पक्ष या दोन्ही बाजू बळकटपणे मांडण्याचा प्रयत्न मात्र रक्षा खडसे यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.