राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी वादग्रस्त विधान करून मुंबई तसेच महाराष्ट्राचा रोष ओढवून घेतला आहे.यावर अनेक राजकीय नेत्यांनी तसेच सामान्य नागरिकांनी तीव्र शब्दात विरोध दर्शवला आहे .'राज्यपाल भगतसिंह कोशारी हे वादग्रस्त राज्यपाल म्हणून जगभरात प्रसिद्ध असून त्यांनी महाराष्ट्राचा अपमान करण्याची पुन्हा हिंमत करू नये असा इशारा शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.' यावेळी त्यांनी राज्यपालांना समर्थन देणारे नितेश राणे यांच्यावर सुद्धा टीका केल्या आहेत
किशोर पेडणेकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या बद्दल तीव्र प्रतिक्रिया दिली आहे . राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यपाल म्हणून असलेली जबाबदारी कधीच पार पाडली नाही .राज्यपाल हे केवळ वादग्रस्त राज्यपाल म्हणूनच प्रसिद्ध आहे . त्यांना कशीही प्रसिद्धी हवी असते, मग ती प्रसिद्धी नकारात्मक असली तरी चालते .राज्यपाल हे पद सन्मानाचा असल्याने या पदाचा मान राखून मी बोलत आहे ,यापुढे राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान करण्याची हिंमत करू नये असा इशारा शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी दिला.त्याचबरोबर महाराष्ट्रात राहून यांना मराठी माणसांचा विसर कसा पडतो हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
मराठी माणसं सर्वांना सामावून घेतात हा जर राज्यपालांना गुन्हा वाटत असेल तर आम्ही तो पुन्हा करणार नाही असं त्या म्हणाल्या. त्याचबरोबर अशी वक्तव्य करून राज्यातील नागरिकांमध्ये फूट पाडू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे .