सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे - राज ठाकरे
अजित पवारांच्या घरावर रेड पडते मग सुप्रिया सुळेंच्या घरावर रेड कशी पडत नाही. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंना कसं जमत? असं म्हणत राज ठाकरे यांचा सुप्रिया सुळेंवर घणाघात..;
मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (raj thackrey) यांनी गुढीपाडव्यादिवशी शिवतिर्थावर जाहिर सभा घेतली होती.या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जाहिरपणे टिका केली.या सभेनंतर राज ठाकरेंवर भाजपचा स्पीकर म्हणून टिका सुद्धा झाली होती. या सभेतून त्यांनी मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं होतं. यावरून त्यांनीच्यावर अनेक नेत्यांनी टीका केली होती.
आता आज झालेल्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे यांनी सर्वांना प्रतिउत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी "खायचे दात वेगळे आणि दाखवायचे 'सुळे' वेगळे" असं म्हणत पहिला निशाणा सुप्रिया सुळेंवर साधला. अजित पवारांच्या घरावर रेड पडते मग सुप्रिया सुळेंच्या घरावर रेड कशी पडत नाही. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंना कसं जमत? अशी टीका सुप्रिया सुळेंवर केली.
पाडवा सभेनंतर सुप्रिया सुळेंयांनी टीका केली होती..
पाडवा सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं होतं. यावर सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंवर टीका केली होती. "लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे एक ईडीच्या नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं" अशी टीका केली होती.