प्रियंका टिबरीवाल देणार ममता बनर्जी यांना टक्कर; भाजपकडून उमेदवारांची घोषणा

Update: 2021-09-10 07:38 GMT

पश्चिम बंगाल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील तीन जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपने प्रियंका टिबरीवाल यांना भवानीपूरमधून तिकीट दिले आहे, जिथे त्यांचा सामना ममता बॅनर्जी यांच्याशी होणार आहे. याशिवाय भाजपने मिलन घोष यांना समसेरगंज आणि सुजीत दास यांना जंगीपूरमधून उमेदवारी दिली आहे.

कोण आहेत प्रियंका टिबरीवाल ?

41 वर्षीय प्रियंका टिबरीवाल कोलकाता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. यासह त्या युवा मोर्चाच्या भाजपा युवक शाखेमध्ये उपाध्यक्ष पदावर आहेत. प्रियांका 2014 मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या होत्या. त्यावेळी प्रियांका बाबुल सुप्रियोची कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत होत्या. त्यांनीच प्रियांका यांना भाजपमध्ये आणले. प्रियंका टिबरीवाल यांना भाजपने या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत एंटली सीटवरून उमेदवारी दिली होती. येथे टीएमसी नेत्या स्वर्ण कमलने त्यांचा 58,257 मतांनी पराभव केला. त्याचबरोबर ममता बॅनर्जीही त्या निवडणुकीत नंदीग्राममधून पराभूत झाल्या. त्यांचा भाजपाच्या शुभेंदू अधिकारी यांनी 1956 मतांनी पराभव केला. मुख्यमंत्री राहण्यासाठी, आता ममता बॅनर्जी यांना विधानसभेची सदस्य असणे आवश्यक आहे, म्हणून त्या या जागेवरून निवडणूक लढवत आहेत.

Tags:    

Similar News