दलितांना सुरक्षा देण्यात भाजप सरकार फेल, प्रियांका गांधींचा योगींवर घाणाघात
बुधवारी उत्तरप्रदेशमध्ये चौथ्या टप्प्याचं मतदान सुरू झालंय. प्रत्येक पक्ष आणि त्यांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतायत. त्याच पार्श्वभुमीवर प्रियांका गांधींनी विद्यमान भाजप सरकारवर घाणाघाती टीका केलीये. दलितांना सुरक्षा पुरवण्यात भाजप सरकार अपयशी ठरतंय अशी खरमरीत टीका त्यांनी उत्तरप्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर केली आहे.
प्रियांका गांधींनी ट्विट करत भाजप सरकारवर ही टीका केली आहे. त्या त्यांच्या ट्विट मध्ये, "भाजपचे नेते आणि भाजप सरकार यूपीमधील दलितांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरले आहे, तर निवडणुकीच्या वेळी त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवण्याचे नाटक करत आहे. हीच तुमची कायदा आणि सुव्यवस्था आहे, ज्यात दलितांना त्यांच्या घरातून उचलून बेदम मारहाण केली जाते, त्यांच्यावर अत्याचार केले जातात?", असं म्हणाल्या आहेत. या सोबत त्यांनी एक व्हिडीयो देखील पोस्ट केला आहे.
भाजपा नेता व भाजपा सरकार उप्र में दलितों को सुरक्षा देने में नाकामयाब हैं, जबकि सिर्फ़ चुनाव के समय उनके प्रति हमदर्दी का दिखावा करते हैं।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 23, 2022
क्या यही है आपकी कानून व्यवस्था, जिसमें दलितों को उनके घरों से उठाकर बेरहमी से पीटा जाता है, उन पर अत्याचार होता है?#मुज़फ़्फ़रनगर pic.twitter.com/bUvnwljloI