'मेळावा होईल की नाही अशी ज्यांना शंका होती त्यांनी जरा डोळे उघडून ही गर्दी पहावी. हा मेळावा कोणत्या राजकीय पक्षाचा नाही. हा मेळावा वंचित माणसांचा आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मोठं आहे त्यासाठी लवकरच मदत केली जाईल असे आश्वासन खासदार प्रीतम मुंडे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात केले आहे.
दरवर्षी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. मेळाव्यात काय बोललं जाणार याकडे सर्व महाराष्ट्र लक्ष लावून असतो. दरवर्षी हा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्ष्यात देशावर असलेलं कोरोनाचे संकट पाहता हा मेळावा ऑनलाइन पद्धतीने होत होता. मात्र यंदा कोरोनाची सावट कमी झाल्याने भगवानगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी मेळावा होईल की नाही अशी ज्यांना शंका होती त्यांनी जरा डोळे उघडून ही गर्दी पहावी. हा मेळावा कोणता राजकीय पक्षाचा नाही. हा मेळावा वंचित माणसांचा आहे. इथे आल्यावर प्रत्येकाला संघर्ष करण्याची ऊर्जा मिळते. आमचं भाग्य खूप थोर आहे की आम्हाला मुंडे साहेबांच्या घरी जन्म घेता आला. कधी खर्च न होणारी, आपच्यासाठी कधीही चोरी न होणारी संपत्ती म्हणजे आमच्या वडिलांनी जमवलेला हा जनसमुदाय आहे. मराठवाड्यात यंदा पुराणे मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे पूरग्रस्तांना लवकरच मदत केली जाईल आम्ही तुमच्या सर्वांसोबत आहेत. असं आश्वासन खासदार प्रीतम मुंडे यांनी आज सावरगाव येथील भगवानगडावर आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.