"पंकजा मुंडेंना विधानपरिषद म्हणजे जीवन मरणाचा.." याच वक्तव्यामुळे मुंडे समर्थक प्रवीण दरेकरांवर संतापले
भाजपाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे बीड दौऱ्यावर आले असता पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. सध्या पंकजा मुंडे समर्थकांमध्ये मोठी नाराजी दिसत आहे. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळेल असे सर्वांना वाटत होते मात्र त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे भाजप पंकजा मुंडे यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न करत मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत.
पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी, पंकजा मुंडे अजिबात नाराज नाहीत. त्यांच्या साठी विधानपरिषद म्हणजे जीवन मरणाचा किंवा मोठा प्रश्न नसल्याचं ते म्हणाले व त्याचा परिणाम काल ते बीड मध्ये आल्यानंतर पाहायला मिळाला. संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.
प्रवीण दरेकर यांनी नक्की काय वक्तव्य केले होते?
राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे तीन खासदार निवडून आले असून याचे सर्व यश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे जाते. देवेंद्र फडवणीस यांच्या मायक्रो नियोजनामुळे भाजपाचे खासदार निवडून आले आहेत. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप बाजी मारणार व पुढील काळात मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल असाही विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला ते आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता माध्यमांशी बोलत होते.
राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार यांचा मोठा पराभव झाला हे शिवसेनेचे अपयश आहे. त्यांच्या जागी कोल्हापूरचे धनंजय महाडिक भाजपाच्या नेतृत्वाखाली निवडून आले. ही सर्व कमाल भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी घडवून आणली पंकजा ताई अजिबात नाराज नाहीत. त्यांच्या साठी विधानपरिषद म्हणजे जीवन मरणाचा किंवा मोठा प्रश्न नाही नसल्याचं सुद्धा ते म्हणाले..