'ईडी जिसकी मम्मी हैं वो सरकार निकम्मी हैं' नारा देत प्रणिती शिंदेंचा राज ठाकरे, किरीट सोमय्या व केंद्र सरकारवर हल्लबोल..

राज ठाकरे यांचा जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे आज त्यांचंच गुणगान गात आहेत तर किरीट सोमय्या... प्रणिती शिंदे कडाडल्या;

Update: 2022-04-06 08:53 GMT

देशातील वाढत्या महागाईचा विरोधात करत काँग्रेस कडून देशभर आंदोलन केलं जातं आहे. आज सोलापुरात काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी 'ईडी जिसकी मम्मी हैं वो सरकार निकम्मी हैं' असा नारा देत राज ठाकरे, ED, किरीट सोमय्या व केंद्र सरकारवर जोरदार घणाघात केला.

महागाई विरोधात काँग्रेसचे सोलापुरात तीन दिवस आंदोलन सुरू आहे. आज जे आंदोलन झाले या आंदोलनात आमदार शिंदे देखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी, येत्या काळात महागाई विरोधात कलेक्टर ऑफिस, विविध कार्यालय त्याच सोबत रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करणार असल्याचं सांगत. हे सरकार काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. गोरगरिबांना याची झळ बसत आहे. अगदी पेट्रोल-डिझेल पासून रेशन दुकानात सुद्धा लोकांना धान्य मिळत नाहीये. गोरगरिबांची अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे. मात्र हे महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून केंद्र सरकार वेगळेच मुद्दे हाताळत आहे.

केंद्र सरकारचा जात-पात, धर्म हाच एक कलमी अजेंडा चालू आहे. निवडणुका तोंडावर आल्या की भाजपचे असे वेगवेगळे कार्यक्रम सुरू होतात. मग कोणाला ED ची भीती दाखवली जाते, सातशे आत्महत्या झाल्यानंतर काळे कायदे मागे घेतले जातात, कुठे पिक्चर रिलीज केले जातात , कुणाची तर बदनामी केले जाते. लोकांचा जीव घेऊन राजकारण करण्याची भाजपची मानसिकता असल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

किरीट सिमय्यांवर सुद्धा साधला निशाण..

ED चा ज्या प्रकारे सध्या वापर केला जात आहे पण हाच गेम त्यांच्यावर सुद्धा उलटणार आहे. आणि आता ते होताना देखील दिसत आहे. या संस्थांवर कोणाचाही दबाव नसावा काँग्रेसने हे कधीच केलं नाही. ते जे करत आहेत ते कुठे ना कुठे त्यांच्यावर नक्की उलटणार असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्यांवर देखील निशाण साधला.

राज ठाकरे जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न 

राज ठाकरे यांचा जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. MIM, बहुजन वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे. त्याचबरोबर मनसे भाजपची सी टीम आहे. महत्वाचे मुद्दे बाजूला सारून लक्ष भटकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे आज त्यांचंच गुणगान गात आहेत. इलेक्शनच्या तोंडावर महत्वाचे मध्ये बाजुला सारण्यासाठी त्यांचे हे षड्यंत्र आहे असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर देखील निशाण साधला आहे.

Tags:    

Similar News