"पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करा"

संजय राठोड यांच्या विरोधात बंजारा समाजातील महिला रस्त्यावर, मुख्यमंत्र्यांकडे राजीनाम्याची मागणी...

Update: 2021-02-26 08:30 GMT

पंधरा दिवस होऊनही पूजा चव्हाणची आत्महत्या की, हत्या हे स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. अशी मागणी आता बंजारा समाजातील महिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तसंच मंत्री संजय राठोड यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, या मागणीचं निवेदन बंजारा समाजातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.

आरोप असलेल्या मंत्र्यांनी पोहरादेवी येथे जाऊन पूजा चव्हाण बद्दल एकही शब्द काढला नाही. या घटनेतील सत्य अजूनही पडद्यामागे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेऊन सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News