"भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरला"

pooja Chavan case : पूजाला जेव्हा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं तेव्हा पुण्याचे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी दोरीच्या सहाय्याने पूजाच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करुन तिचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरल्याचा आरोप शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी केला आहे.;

Update: 2021-03-04 09:00 GMT

पूजाच्या मृत्यूनंतर भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी, पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप चोरल्याचा आरोप शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी केला आहे. त्या लॅपटॉप आणि मोबाईल मधील फोटो हे स्वतःच्या स्वार्थासाठी, चित्रा वाघ आणि धनराज घोगरे मीडियाला देत आहेत. असा गंभीर आरोप बंजारा समाजाच्या नेत्या शिवसेना जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी केलाय. यामुळं तात्काळ दोघांवर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी देखील चव्हाण यांनी केली आहे.

या सोबतच संगीता चव्हाण यांनी "पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बंजारा समाजाची बदनामी होईल, असं वक्तव्य अनेक वेळा केलं आहे. त्यामुळं बंजारा समाजाची नाहक बदनामी झालीय." असा आरोप करत बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Tags:    

Similar News