खरे महाराष्ट्र द्रोही तुम्हीच अयोध्या पौळ यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाला महाराष्ट्रातून तीव्र विरोध होत असताना नितेश राणे यांनी राज्यपालांच्या विधानाचे समर्थन केले आहे;

Update: 2022-07-30 05:51 GMT


राज्यपाल भगत सिंह कोष्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबई संदर्भात आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

एका कार्यक्रमात बोलत असताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी, "महाराष्ट्रात मी लोकांना सांगत असतो. की मुंबई ठाण्यातून गुजराती आणि मारवाडी ‌‌‌‌‌‌निघाले तर ‌‌‌‌‌‌‌‌‌मुंबई आर्थिक राजधानी  राहणार नाही." असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. असं बोलुन राज्यपालांना काय साध्य करायचे आहे हा प्रश्न उपस्थित होतो. 

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाला महाराष्ट्रातून तीव्र विरोध होत असताना नितेश राणे यांनी राज्यपालांच्या विधानाचे समर्थन केले आहे

त्यांनी एक ट्विट शेअर केलं आहे. ते म्हणतात "मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी.किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात."

या ट्विटला तीव्र प्रतिक्रिया अयोध्या सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आयोध्या पौळ पाटील यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News