"हा केवळ मूर्खपणा नाही तर यामागे हलकट मानसिकता" चित्रा वाघ संतापल्या

भाजपने अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागावी अशी मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत आक्रमक भूमिका घेतली आहे

Update: 2022-07-28 11:41 GMT

भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विजयी होत राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद गुरूवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. दरम्यान यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

खासदारांचे निलंबन, महागाईवर संसदेत चर्चा करण्याची मागणी, सोनिया गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्या मुद्द्यांवरुन काँग्रेस खासदार गेल्या काही दिवसांपासून संसदेबाहेर आंदोलन करत आहेत. या आंदोलना दरम्यान एका न्यूज चॅनेलशी बोलताना अधीर रंजन चौधरी यांनी द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यांच्या याच वक्तव्यावरुन भाजपने आता अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागावी अशी मागणी करत लोकसभा आणि राज्यसभेत आक्रमक भूमिका घेतली आहे .

दरम्यान चित्रा वाघ यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे, त्या ट्विट करत म्हणाल्या की.. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेली काँग्रेसला का पाहवत नाही ? त्यातूनच काँग्रेस गट नेते अधीर रंजन चौधरी यांनी महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मर्मू यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला. हा केवळ मूर्खपणा नाही या मागे अत्यंत हलकट मानसिकता आहे.. अस म्हणत त्यांनी@BJP4Maharashtra ला टॅग केले आहे

Tags:    

Similar News