''मला एका ब्रेकची आवश्यकता आहे आणि मी दोन महिने सुट्टी घेणार आहे'' असं पंकजा मुंडे म्हणाल्या आणि त्याची सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली... सुट्टी म्हटलं की आपल्याला सरकारी नोकरदार किंवा कुठल्यातरी ठिकाणी नोकरी करणारी लोकं डोळ्यासमोर येतात. जे नियमितपणे साप्ताहिक सुट्टी घेतात. १० दिवस रजा टाकून कुठे तरी फिरायला जातात. पण राजकीय लोकांना सुट्टी किंवा रिटायरमेंट या गोष्टी आपण कधी पाहिल्या नाहीत, ऐकल्याही नाहीत किंवा कोणत्या राजकीय नेत्याने अशी सुट्टी घेतली तरी त्याबद्दल कधी वाच्छता केली नाही. बहुदा त्यामुळेच पंकजा मुंडे यांच्या सुट्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. आता पंकजा मुंडे सुट्टी घेणार म्हटल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील लोकांना काय वाटतं हे सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही थेट बीडमध्ये गेलो व बीड मधील लोकांना पंकजा मुंडे यांच्या सुट्टी विषयी आम्ही विचारलं आणि लोकं बोलू लागली...