बीड : भाजप खासदार प्रितम मुंडे (pritam munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे (pankaja munde) नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच, आता शिवसेनेच्या एका नेत्याने पंकजा मुंडे (pankaja munde) यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. तसेच पंकजा मुंडे (pankaja munde) यांना योग्य तो मानसन्मान दिला जाईल, असे वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी केले आहे.
बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडेंवर (pankaja munde) बोलताना म्हणाले की, "भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. त्यांचा योग्य तो मानसन्मान दिला जाईल, पंकजा मुंडे (pankaja munde) या बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचे स्वागत होईल. तसेच त्यांचा योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून केला जाईल," असे शंभुराज देसाई (shambhuraj desai) म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यात वरळीत झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी आपल्या भाषणातून भाजपला नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे सूचक इशारा सुद्धा दिला आहे.त्यामुळे त्यांची नाराजी अजूनही कायम असल्याचं बोलले जात आहे.