पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळावं यासाठी चक्क..

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे याच्यासाठी बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी मोहटादेवीला पायी दिंडी काढली आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना अनेक वेळा मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं मात्र यावेळेस त्यांना मंत्रिमंडळ असताना मिळावं याच्यासाठी बीड जिल्ह्यातील जे पदाधिकारी आहेत कुणी पांडुरंगाला साकडं घालतोय.... तर कोणी मोहटादेवीला पायी चालत साकडं घालतोय... प्रतिनिधी हरीदास तावरेंचा रिपोर्ट...

Update: 2022-07-08 04:52 GMT

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे याच्यासाठी बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी यांनी मोहटादेवीला पायी दिंडी काढली आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना अनेक वेळा मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं मात्र यावेळेस त्यांना मंत्रिमंडळ असताना मिळावं याच्यासाठी बीड जिल्ह्यातील जे पदाधिकारी आहेत कुणी पांडुरंगाला साकडं घालतोय.... तर कोणी मोहटादेवीला पायी चालत साकडं घालतोय... प्रतिनिधी हरीदास तावरेंचा रिपोर्ट...

या सर्व गोष्टी करत असताना पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या खंबीर नेत्या आहेत ज्या वेळेस पालकमंत्री होत्या त्यावेळेस त्यांनी बीड जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला व तो सतमार्गी लावला मात्र यावेळेसही पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावं याच्यासाठी महिला पदी पदाधिकारी यांनी मोहटादेवीला साकडे घालून पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं याच्यासाठी पायी वारी केली आहे.

पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावं... मंत्री पद मिळावं... याच्यासाठी आम्ही सगळ्या महिला भगिनी बीड जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी आम्ही प्रीतम ताई मुंडे व पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज मोठा देवीला साकडं घालण्यासाठी आज पायी चालत जाणार आहोत आणि पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळात नक्कीच स्थान मिळेल त्याचबरोबर त्यांना मंत्री पदाची लवकरच शपथ मिळेल अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. आम्हाला नक्कीच विश्वास आहे की पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल. कुठल्याही गोष्टीत भक्तीची शक्ती असावी लागते आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळेल. नक्कीच आमच्या भक्तीमध्ये शक्ती आहे आणि ताईंना मंत्रिपद मिळेल हा आमचा विश्वास आहे, असे संगीता धसे म्हणाल्या.

आम्ही मोहटादेवीला साकडे घालण्यासाठी निघालेलो आहोत पंकजाताई यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं याच्यासाठी आम्ही सर्व महिला पदाधिकारी आज मोहटादेवीला साकडे घालण्यासाठी निघालेलो आहोत. बीड जिल्ह्याचा विकास होण्यासाठी पंकजाताई मुंडे यांना मंत्रीपद द्यावच लागेल.. नाहीतर पक्षाला सुद्धा त्याचं फार मोठं नुकसान होणार आहे पक्षश्रेष्ठी हे आमच्या ताईचा नक्कीच विचार करणार आहेत नक्कीच यावेळेस पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे शैलाताई मुसळे म्हणाल्या.

पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळ असताना मिळावा म्हणून आम्ही सगळ्या तळागाळातील महिला आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ स्थान मिळावं म्हणून मोठा देवी ला साकडे घालण्यासाठी आम्ही पायी दिंडी काढली आहे पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आमची महिला शक्ती खंबीरपणे उभा राहणार आहे त्याच्यामुळे पंकजाताई मुंडे यांना नक्कीच मंत्रिपद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा आम्हाला विश्वास आहे, असे भाजप महिला पदाधिकाऱ्यांचे म्हणने आे.

राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालेला आहे शिंदे गट शिवसेना आणि भाजप युतीमध्ये सरकार आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीची परत एकदा सत्ता आलेली आहे मंत्रिमंडळाचा जो विस्तार होणार आहे त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये माझी पालकमंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे म्हणून आज बीड जिल्ह्या महिला आघाडीच्या वतीने पायी दिंडी काढली आहे व पंकजाताई मुंडे यांचे मंत्रिमंडळ स्थान मिळावं व मंत्रिमंडळात नाव समावेश व्हावं हीच भावना घेऊन आज महिला पदाधिकारी यांनी पायी दिंडी काढली आहे.

राज्यातील तमाम मुंडे भक्तांची व ताईंवर प्रेम करणाऱ्या लोकांची भावना होती की मागच्या विधान परिषदेमध्ये देखील ताईंना संधी मिळावी परंतु या ठिकाणी संधी मिळाली नाही परंतु आता राज्यात सत्ता परिवर्तन झालेला आहे त्यामुळे ताईंना नक्कीच मंत्रिमंडळ स्थान मिळेल असेभाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले.

Tags:    

Similar News