वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून गरिबांच्या पोटाची भुक शमणार आहे का? - पंकजा मुंडे
आज १२ डिसेंबर ला शरद पवार यांचा वाढदिवस आहे तर दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांची जयंती आहे. पवारांच्या वाढदिवसानिमीत्त सजलेल्या परळी वरून पंकजा मुंडेंनी थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. स्वतःचा वाढदिवस आणि आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्य दिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार आहे? खूप मोठी प्रतिकृती बनवली, पेंटिंग्ज केलं म्हणजे गरिबांच्या पोटाची भुक शमणार आहे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडें यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.