पंकजा मुंडे ऍक्टिव्ह होताच प्रीतम मुंडे सुद्धा 'ऑन ग्राउंड'
गेली काही दिवस फिल्डवर न दिसणाऱ्या प्रीतम मुंडे सद्या दौऱ्यावर पाहायला मिळत आहे...;
खासदार प्रितम मुंडे ( pritam munde ) यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे ( pankaja munde ) नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र वाढदिवसानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( amit shah) यांचा फोन आल्यानंतर पंकजा मुंडेंची ( pankaja munde ) नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांनतर पंकजा मुंडे ( pankaja munde ) आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळाले. तर पंकजा मुंडे ऍक्टिव्ह होताच प्रीतम मुंडे सुद्धा 'ऑन ग्राउंड' पाहायला मिळत आहे.
गेली काही दिवस फिल्डवर न दिसणाऱ्या प्रीतम मुंडे सद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पाहायला मिळत आहे. अनेक उद्घाटनच्या कार्यक्रमांना हजेरी,कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसेच पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थिती सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाराज असलेल्या मुंडे भगिनींची नाराजी दूर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांच्या नावाची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र ऐनवेळी भाजप खासदार भारती पवार यांना संधी देण्यात आली होती. त्यांनतर मुंडे समर्थकांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. तसेच मुंडे भगिनी सुद्धा नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या,पण पंकजा मुंडे यांची दिल्ली वारी आणि त्यांनतर वाढदिवसानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आलेल्या फोननंतर पंकजा मुंडे ( pankaja munde ) यांची नाराजी दूर झाल्याच बोलले जात आहे. तर दोन्ही बहिणी आता आपल्या मतदारसंघात पुन्हा सक्रीय झाल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे.