"हमारा महाराष्ट्र अच्छे कामोंके लिए नही कोविड मरिजोंकी संख्यामें अव्वल है"

अर्थमंत्र्य़ांनी GSTचे पैसे द्यावेत, जेणेकरुन राज्य सरकारला रुग्णालयांची कामं करता येतील असं देखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

Update: 2021-03-23 12:00 GMT

केंद्राने राज्याच्या हक्काचा GST चा निधी अजून दिलेला नाही अशी तक्रार राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. याचाच आधार घेत अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर उपरोधीत टीका केली आहे.

लोक सभेतील आपल्या भाषणात खासदार राणा यांनी "माझ्या महाराष्ट्रातील काही सहकाऱ्यांनी GST चा निधी मिळत नसल्याची खंत बोलून दाखवली. निधी न देण्यामागचं कारण आम्हाला माहिती आहे. पण, तरिही मी अर्थमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी महाराष्ट्राच्या हक्काचा जो काही निधी बाकी आहे तो देण्यात यावा." असं म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "आमच्या राज्यात रुग्णालयांची स्थिती अत्यंत खराब आहे. संपुर्ण देशात आम्ही चांगल्या कामांसाठी नाही तर कोरोना रुग्णांच्या संख्येत अव्वल आहोत. जर तुम्ही GST चे पैसे दिलेत तर आरोग्य सुविधांची कामं होतील."


Tags:    

Similar News