आज पासून संसदेच अधिवेशन सुरू झालंय त्यामुळे काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असल्याने नवीन मंत्र्यांचा परिचय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिला. मात्र यावेळी संसदेत विरोधी पक्षांनी गोंधळ घातला असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी करत भाजप सरकारची पाठराखण केली, या मंत्रीमंडळात एससी, आदिवासी व महिलांना संधी देण्यात आली मात्र यावेळी विरोधी पक्षांनी मोदींच भाषण ऐकलं नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी महिलांचा अपमान केला असा आरोप करत मी याचा निषेध व्यक्त करते अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.