"देशात फक्त 25% मुलंच ऑनलाइन शिक्षण घेण्यास सक्षम"
उर्वरित मुलांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल;
एवढ्या मोठ्या 'देशात फक्त 25% मुलंच ऑनलाइन शिक्षण घेण्यास सक्षम' आहेत. असं सरकारनेच आपल्या एका अहवालात म्हटलंय. त्यामुळे उर्वरित मुलांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहे का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उपस्थित केला.