"ओबीसींच्या पाठीमागे भाजपा खंबीरपणे उभी"

पंकजा मुंडे यांचं OBC समाजाला आश्वासन

Update: 2021-06-26 08:00 GMT

स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेल्याने, आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपकडून आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पुण्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. यावेळी, 'जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही', असा असा पुन्हा एकदा इशारा पंकजा मुंडेंनी दिला.

पुण्यातील भाषणात पंकजा मुंडे म्हणाल्या की, "एवढं छोटं मन ठेवून तुम्ही मोठं होऊ शकत नाही. या सरकारचा मला सांगायचंय, तुम्ही चुकून राज्यात सत्तेवर आलात भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय. सरकारने फक्त 15 महिने गोल गोल फिरवलं, कुठलाही डाटा कोर्टात जमा केला नाही."

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका… संघर्षाची भावना तुटू देऊ नका… ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. भविष्यातल्या संघर्षासाठी आम्ही तयार आहोत."

दरम्यान, ओबीसी आरक्षणासाठी आज भाजपाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात १ हजार ठिकाणी जेलभरो आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, बीड, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, ठाणे, नाशिक, मुंबईसह अनेक जिल्ह्यांमधे सध्या भाजपाने चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Tags:    

Similar News